सुमेध यांच्या पार्थिवावर लोणाग्रा येथे आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:11 AM2017-08-14T02:11:58+5:302017-08-14T02:12:09+5:30
अकोला : जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शहीद झालेल्या सुमेध यांच्या पार्थिवावर सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोणाग्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुमेध यांचे पाíथव लोणाग्रा येथे पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शहीद झालेल्या सुमेध यांच्या पार्थिवावर सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोणाग्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुमेध यांचे पाíथव लोणाग्रा येथे पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सुमेध शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी गावात सकाळी ६ वाजेदरम्यान दिली. पोलिसांकडून ही माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. एकीकडे दु:ख अन् दुसरीकडे गावचा सुपुत्र शहीद झाल्याचा सार्थ अभिमान, असे काहीसे भाव प्रत्येकाच्या चेहर्यावर होते. सुमेध यांच्या आई -वडिलांना धीर देत ग्रामस्थांनी सावरले.
अखेरचे बोलणे!
सुमेध यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधून ख्याली खुशाली विचारली होती. तसेच लहान भाऊ शुभमला सागर येथे भेटण्याचा मानसही बोलून दाखविला होता. ऑक्टोबर महिन्यात नक्की येणार, असे सांगून तूर्त सुट्टीवर येण्याचे टाळले होते. शुक्रवारी आई-वडिलांनी सुमेधशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत सुमेधशी बोलणेच झाले नाही आणि रविवारी पहाटेच सुमेध शहीद झाल्याची वार्ता समजली.
पाच ठिकाणी केली सेवा
सुमेध गवई यांनी राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, पाकिस्तान बॉर्डर या ठिकाणी देशसेवा बजावली. गत सहा महिन्यांपूर्वीच सुमेध यांची जम्मू आणि काश्मीर येथे अडीच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
१ ऑगस्टला वाढदिवस साजरा
सुमेध गवई चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहते. त्यांचा लहान भाऊ शुभमही लष्करात सेवा बजावतो. १ ऑगस्ट रोजी सुमेध यांचा वाढदिवस साजरा झाला होता.
गृहराज्यमंत्र्यांकडून सांत्वन
सुमेध गवई यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, आ. बळीराम सिरस्कार आदींनी लोणाग्रा येथे धाव घेतली आणि सुमेध यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.