मूर्तिजापूर येथे आज शेतकरी एल्गार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:01 AM2017-12-25T02:01:52+5:302017-12-25T02:02:12+5:30
मूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तुपकर, प्रा. शरद पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मेळाव्यामध्ये एकरी २५ हजार रुपये बीटी कंपन्यांकडून शेतकर्यांना लागवड खर्चाची नुकसान भरपाई देण्याचा हायकोर्टाने आदेश देऊनही विदर्भातील शेतकर्यांना अजून पर्याय न दिलेली हेक्टरी ६ हजार ८00 रुपयांची मदत विनाविलंब द्यावी, कर्जमाफीसाठी दीड लाखापेक्षा जास्त कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबर या अंतिम तारखेऐवजी ३0 जून २0१८ अंतिम तारीख करावी. उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा या दराने शेतमालाला हमीभाव जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.