सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:24 AM2018-02-18T02:24:54+5:302018-02-18T02:25:06+5:30

अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

Today's motorcycle rally of the public Shivajayanti Festival Committee | सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी भव्य मिरवणूक, पोवाडे व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, सचिव अविनाश नाकट, डॉ. अभय पाटील, जगदीश मुरूमकार, संग्राम गावंडे, युवराज गावंडे, संदीप पाटील, राजेंद्र पातोडे, मनोज तायडे, सुषमा निचळ, मंदा देशमुख, प्रकाश तायडे, कपिल रावदेव, प्रदीप वखारिया, अशोक पटोकार, पंकज साबळे, पंकज जायले, अविनाश देशमुख व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्कमधील आणि श्री शिवाजी महाविद्यालयातील छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी गत महिनाभरापासून विविध समित्या परिश्रम घेत आहेत. शिवजयंतीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, पक्ष आणि सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न समिती करीत आहे. अकोल्यातील शिवजयंती के वळ उत्सव न राहता ती प्रबोधनात्मक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी सांगितले.

मिरवणूक मार्गात बदल 
दरवर्षी शिवजयंती मिरवणूक टिळक मार्गे जाते; मात्र यंदा या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने उत्सव समितीने मार्गात बदल केला आहे. दुपारी ३ वाजता ही मिरवणूक शिवाजी पार्क येथून अकोट स्टँड, दामले चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गे प्रमिलाताई ओक सभागृहासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पोहोचेल. येथे मिरवणुकीचे रूपांतरण जाहीर सभेत होणार आहे. औरंगाबाद येथील शाहिरांचे पोवाडे येथे होणार असून, सायंकाळी ७ वाजता इतिहास अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांचे व्याख्यान होणार आहे.

मिरवणुकीतील  विशेष आकर्षण
शिवजयंतीनिमित्त सोमवारी निघणार्‍या मिरवणुकीत भजनी मंडळे, व्यायामशाळा, विविध देखावे, छत्रपती आणि जिजाऊंची वेशभूषा केलेले कलावंत, दिंड्या, ढोल-ताशे, पथक, प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. जिजाऊंच्या भूमिकेत नामांकित अभिनेत्री अकोल्यात येणार असल्याची माहितीही येथे देण्यात आली.

जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली
शिवजयंतीमध्ये सर्व धर्मीयांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता जिल्हा परिषद कर्मचारी भवनापासून भव्य मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. 
 

Web Title: Today's motorcycle rally of the public Shivajayanti Festival Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.