चिमुकले सुटली स्टेशनवर, दिव्यांग आई-वडील ट्रेनमध्ये; जीआरपीच्या सतर्कतेनंतर झाली भेट
By सचिन राऊत | Published: July 16, 2023 02:25 PM2023-07-16T14:25:12+5:302023-07-16T14:25:20+5:30
आई वडील दिव्यांग असल्याची माहीती मीळाल्यानंतर अकाेला रेल्वे पाेलिसांनी तातडीने शेगाव येथे संपर्क करीत रेल्वे थांबवली.
अकाेला : अकाेला रेल्वे स्थानकावरुन अमरावती एक्सप्रेसने मुंबइकडे जात असतांना दिव्यांगाच्या डब्यामधील जागा फुल्ल झाल्यानंतर आई वडील जनरल डब्यात चढले मात्र त्यांची दाेन मुले अकाेला रेल्वे स्थानकावरच राहीली. आई वडील दिव्यांग असल्याची माहीती मीळाल्यानंतर अकाेला रेल्वे पाेलिसांनी तातडीने शेगाव येथे संपर्क करीत रेल्वे थांबवली. त्यानंतर दाेन्ही मुलांना शेगाव येथे पाठवून आई वडीलांची भेट घालूण दिली.
गजानन इंगळे हे त्यांची अपंग पत्नी व दोन मुले सुचित वय १४ वर्ष, संस्कृत, वय ६ वर्ष यांच्यासह अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकाेला रेल्वे स्थानकावर उभे हाेते. अमरावती एक्सप्रेस आल्यानंतर अपंगांच्या डब्यामध्ये प्रचंड गर्दी असल्याने गजानन इंगळे व त्यांची २ मुले कोचमधून उतरून जनरल कोचमध्ये चढण्यासाठी जात असताना इंगळे कोचमध्ये बसले. परंतु दोन लहान मुले अकाेला स्टेशनवरच राहीली़ गाडी रवाना झाल्यानंतर या संदर्भात रेल्वे पाेलिसांना महिती मिळाल्याने दोन्ही मुलांना पाेलिसांनी साेबत घेतले. त्यानंतर शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे मुलांच्या आई-वडिलांना ट्रेनमधून खाली उतरून घेण्याबाबत माहिती दिली. दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिस अंमलदार व चाइल्ड लाईन सदस्य यांच्यासह दुसऱ्या ट्रेनने शेगाव येथे पाठवून सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.