निकामी खोक्यापासून शौचालय!
By admin | Published: February 12, 2017 01:12 AM2017-02-12T01:12:59+5:302017-02-12T01:12:59+5:30
मंगरुळपीरमधील प्रयोग; गरीब दाम्पत्याचा स्वच्छता अभियानाला अभिनव प्रतिसाद
रिसोड, दि. ११- महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत ३१ जानेवारीपासून संपूर्ण शहर हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. सोबतच यापुढे उघड्यावर शौचविधीच्या प्रकारावर कायम नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. कॅमेर्यांमध्ये कैद होणार्यांवर थेट फौजदारी दाखल केली जाईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. मुख्याधिकारी पानझाडे व नगराध्यक्ष यशवंत देशमुख यांनी ३१ जानेवारीला विशेष सभा घेवून रिसोड शहर हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा केली. त्यानुसार, यापुढे कुणीही उघड्यावरील हगणदरीवर करडी नजर ठेवली जात असून शहरातील अमरदास नगर, महात्मा फुले नगर, निजामपूर रोड, पॉवर हाऊस परिसर, जिजाऊ नगर आदीठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्या जाणार आहेत. शहर संपूर्ण हगणदरीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेने ह्यअँक्शन प्लानह्ण तयार केला असून याव्दारे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दिवसरात्र तैनात राहणार असून उघड्यावर शौचास जाणारा व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी पानझाडे यांनी दिला आहे.