शौचालय उभारणीत क्षेत्रीय अधिकारी ‘बॅकफूट’वर

By admin | Published: February 8, 2016 02:30 AM2016-02-08T02:30:32+5:302016-02-08T02:30:32+5:30

उत्स्फूर्तपणे सहभाग नाही; प्रशासकीय कामकाज प्रभावित.

In the toilet establishment, the Regional Officer 'Backfoot' | शौचालय उभारणीत क्षेत्रीय अधिकारी ‘बॅकफूट’वर

शौचालय उभारणीत क्षेत्रीय अधिकारी ‘बॅकफूट’वर

Next

अकोला: शहरात वैयक्तिक शौचालय उभारून देण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली असली तरी या मोहिमेत क्षेत्रीय अधिकार्‍यांचा सहभाग नाममात्र असल्याचे समोर येत आहे. स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या स्तरावर शौचालयाचे कामकाज सुरू असून, क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या भूमिकेमुळे मोहिमेला गती नसल्याचे चित्र आहे. उघड्यावर शौचविधी करणार्‍या नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यासाठी शासनाकडून महापालिका प्रशासनाला पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी प्राप्त झाला. प्रशासनाच्या शोध मोहिमेत १0 हजार ७00 नागरिकांक डे शौचालय नसल्याचे समोर आले. सद्यस्थितीत प्रशासनाकडे ७ हजार ५६0 पेक्षा जास्त अर्ज असले तरी कर्मचार्‍यांच्या सर्व्हेदरम्यान आणखी दोन हजार नागरिकांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले. यामुळे मनपाला अतिरिक्त शौचालयांचे बांधकाम करावे लागणार. शौचालयासाठी पात्र लाभार्थींंचा शोध घेणे, त्यांच्या जागेच्या संदर्भातील समस्या जाणून त्या सोडविणे आदी कामांपासून ते बांधकाम सुरू केल्यानंतर त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंते पार पाडत आहेत. अर्थातच, ही व्यापक मोहीम असल्याने संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणे अपेक्षित होते. तसे होत नसल्यामुळे कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत आहे. क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या भूमिकेवर मनपाच्या प्रशासकीय वतरुळात चांगलीच नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: In the toilet establishment, the Regional Officer 'Backfoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.