टोकन यादी; १३७१ नावे गहाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:59 AM2017-08-05T01:59:53+5:302017-08-05T02:19:10+5:30
अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्यांना देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १ हजार ३७१ शेतकर्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शेतकर्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्यांना देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १ हजार ३७१ शेतकर्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शेतकर्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाफेडद्वारे तालुकास्तरावरील खरेदी केंद्रांवर हमीदराने तूर खरेदी १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मेपर्यंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेत ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदी पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु टोकन दिलेल्या शेतकर्यांच्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी करायची की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकर्यांचे नाव, गाव व टोकन नंबरसह यादी पाठविण्यात आली. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीनेसुद्धा ४ हजार ९१७ टोकनधारक शेतकर्यांची यादी पाठविली. जिल्हाधिकार्यांनी टोकन देण्यात आलेल्या शे तकर्यांची तूर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या घरी जाऊन तुरीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करण्याकरिता तलाठी व कृषी सहायकांना निर्देश दिले, तसेच ज्या टोकनधारक शेतकर्यांचे पंचनामे करावयाचे आहेत, त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली; परंतु या अधिकृत यादीमधून अकोट बाजार समितीने पाठविलेल्या यादीमधील धरसोड करीत मधातल्या तब्बल १ हजार ३७१ शे तकर्यांची नावे गहाळ करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामध्ये अकोट बाजार समितीने ४ हजार ९१७ टोकनधारक शे तकर्यांची यादी दिली. त्यापैकी ७३८ शेतकर्यांचे मोजमाप झाले, तर पंचनाम्याकरिता अपलोड केलेल्या यादीत २१२२ शे तकर्यांची नावे आहेत; परंतु ती नावेसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोकन रजिस्टरप्रमाणे नाहीत. त्या यादीमधील अनुक्रमे ७३८ ते १७५३ यादरम्यानच्या १११५ शेतकर्यांची नावे, १८९0 ते २0६८ मधील १७८ तर ४२४८ ते ४२८५ मधील ३७ आणि ४३१२ ते ४३५३ यामधील ४१ असे एकूण १ हजार ३७१ शेतकर्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षित पणामुळे गहाळ झाले असल्याचे दिसून येत आहे. या यादीनुसार तलाठी व कृषी सहायकांनी पंचनामा करण्यास प्रारंभ केला आहे. तर दुसरीकडे मधातील टोकनधारक शेतकर्यांची नावे गहाळ असल्याने त्याच्यापुढील शेतकर्यांचे पंचनामे होण्याची शक्यता आहे.