तांत्रिक कामगारांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:02 PM2017-09-04T20:02:33+5:302017-09-04T20:03:24+5:30
अकोला : महावितरणच्या जुन्या लघू व उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे कर्मचारी, नागरिक, गुरांचा अपघाती मृत्यू होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या पृष्ठभूमीवर या जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवार, ६ सप्टेंबर रोजी महावितरणच्या प्रत्येक विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्या त येणार आहेत. तर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ कार्यालयांसमोर धरणे देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

वीज मंडळाचे विभाजन झाल्यानंतर इन्फ्रा-१ व इन्फ्रा-२ योजना आल्या. उपकेंद्रांची जुनी यंत्रणा बदलणे, त्यांची क्षमता वाढविण्याचे काम करण्यात आले. परंतु जुन्या विद्यु त लाइन बदलल्या नाहीत. जुन्या वाहिनींवर विद्युत उ पकेंद्रांची संख्या वाढली, त्यामुळे लाइन कमकुवत झाल्या. जुने निर्मितीचे संच बंद करून नवीन संच उभे करण्यात आले. पारेषणनेदेखील उपकेंद्रांची संख्या वाढविली, नवीन ब्रेकर बसविले; परंतु जुन्या लघू व उच्च दाब वाहिन्या मात्र बदलल्या नाहीत. जुने खांब, स्ट्रक्चर, विद्युत वाहिनीमुळे कर्मचारी, नागरिक, मुके प्राणी यांचे जीव धोक्यात आले आहेत. शॉक लागून, कमकुवत स्ट्रक्चरवर तुटल्याने अनेक कर्मचार्यांना प्राण गमवावा लागला आहे. रोज विद्युत अपघात घडत आहेत; परंतु याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. यासाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. यानुसार बुधवार, ६ सप्टेंबर रोजी महावितरणच्या प्रत्येक विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्या त येणार आहेत, तर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ कार्यालयांसमोर धरणे देण्यात येणार आहेत. याची दखल न घेतल्यास संघटना मुख्य कार्यालय मुंबई येथे आंदोलनाचा निर्णय घेईल, असे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी कळविले आहे.
या आहेत मागण्या
जुन्या लघू व उच्चदाब वाहिनीच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र इन्फ्रा स्थापन करा.
कमकुवत झालेल्या खांबांवर कर्मचार्यांना चढवू नका.
शिडीगाडीची व्यवस्था करा.
अपघात होऊ नये, यासाठी अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करा.
सुरक्षा साधने व सुरक्षा उपायांना प्राधान्य द्या.