तुरीची नोंदणी, खरेदी बंद ; मार्केटिंग फेडरेशनने दिले 'खविसं'ला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:11 PM2018-04-19T14:11:34+5:302018-04-19T14:11:34+5:30
अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने गेल्या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठीची मुदत १८ एप्रिल रोजी संपल्याने, त्यानंतर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करू नये, केल्यास जबाबदारी आपल्या संस्थेची राहील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सर्वच खरेदी केंद्राची जबाबदारी असलेल्या खरेदी विक्री संघाला दिले आहे.
अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने गेल्या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठीची मुदत १८ एप्रिल रोजी संपल्याने, त्यानंतर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करू नये, केल्यास जबाबदारी आपल्या संस्थेची राहील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सर्वच खरेदी केंद्राची जबाबदारी असलेल्या खरेदी विक्री संघाला दिले आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांची नोंदणी असताना त्यांची तूर खरेदी शिल्लक असल्याची माहिती आहे.
आधारभूत किंमत योजनेतून २०१७-१८ या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठी नाफेडने महाराष्ट्र स्टेट को-आॅप. मार्के टिंग फेडरेशन या संस्थेला काम दिले. फेडरेशनने तालुका खरेदी विक्री संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रात तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांना आधीच आॅनलाइन नोंदणी करण्याची पद्धत सुरू झाली. नोंदणी केलेल्या शेतकºयांना मेसेजद्वारे केंद्रात तूर आणण्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार शेतकºयांनी तूर विकण्यासाठी कागदपत्रावरील नोंदीसह नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत सर्वच केंद्रात १ लाख ४० हजार क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली मात्र, खरेदी झाली नाही, असे ४० हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता १८ एप्रिलला तुरीची नोंद व खरेदी दोन्ही प्रक्रिया बंद झाल्याने त्या शेतकºयांच्या तूर खरेदीबाबत शासनाकडून कोणते आदेश दिले जातात, याची प्रतीक्षा शेतकºयांसह संबंधित यंत्रणेला आहे.
ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या ४० हजार शेतकºयांची तूर खरेदी अद्याप शिल्लक आहे. त्याबाबत शासनाकडून पुढील निर्देशाची प्रतीक्षा आहे.
- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.