अव्वल कारकुनास लाच घेताना रंगेहात पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 02:29 AM2017-01-05T02:29:45+5:302017-01-05T02:29:45+5:30
अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई.
पातूर (अकोला), दि. ४- ४ जानेवारी रोजी २ वाजताचे दरम्यान पातूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आरोपी मदन महादेव मांडवे (५३) यास ८ हजार रुपयाची लाच स्वीकारताना अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक यू. के. जाधव यांनी रंगेहात पकडल्याची घटना धडल्यामुळे पातूर तहसील कार्यालयात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याने त्याचे वडिलांचे नावात शेीतसंबंधी बदल करण्यासाठी रितसर पातूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता व त्या संबंधाने सर्व पुरावेसुद्धा जोडले हो ते. मात्र, सदरहु शासकीय काम तहसील कार्यालयातील अववल कारकून आरोपी मदत महादेव मांडवे यांनी केले आहे. म्हणून त्याचा मोबदला म्हणून १२ हजार रुपयाची लाच त्यांनी तक्रारकर्त्यास मागितली होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने ३ जानेवारी रोजी रितसर अँन्टी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने अँन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे तक्रारीची पडताळणी सरकारी पंचासमक्ष केली असता लाचेची मागणी असल्यचे निष्पण्ण झाले व तडजोडीअंती ८ हजार रुपये लाच घ्यायला आरोपी मदन मांडवे तयार झाले व लाचेची रक्कम घेऊन तक्रारकर्त्यास तहसील कार्यालयात बोलावून लाचेचा सापळा लावला असता सरकारी पंचासमक्ष तक्रारकर्त्याकडून८ हजार रुपयाची लाच स्वीकार ताना आरोपी मदन मांडवे यांनारंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम ७ (ड) १३ (१) (ड) १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे. यामुळे मात्र तहसील कार्यालयात धाबे दणाणले आहे.