चुलत बहिणीवर अत्याचार

By admin | Published: March 18, 2015 01:49 AM2015-03-18T01:49:22+5:302015-03-18T01:49:22+5:30

मलकापूर तालुक्यातील घटना; ; गुन्हा दाखल.

Torture on the cousin | चुलत बहिणीवर अत्याचार

चुलत बहिणीवर अत्याचार

Next

मलकापूर (जि. बुलडाणा) : जुळलेला विवाह संबंध मोडण्याची धमकी देत चुलत भावानेच घरी एकटी असल्याचा फायदा उठवत १७ वर्षीय बहिणीवर महिन्यात चार ते पाच वेळा अत्याचार केला. ही घटना तालुक्यातील बहापुरा येथे १६ मार्च रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून खांडवीच्या जंगलातून आरोपीस ताब्यात घेतले आहे. बहापुरा येथे १७ वर्षीय युवती वडिलासोबत राहते. एक वर्षापूर्वी तिच्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांनी अमरदीप बाबुराव उमाळे (वय २७) याला मुलासारखेच मानले. अमरदीप हा पीडित युवतीचा चुलतभाऊ आणि मुलासारखा मानल्याने त्याचे युवतीचे घरी जाणे-येणे होते. अशात सदर युवतीचा अमरदीपच्या बहिणीच्या दीराशी विवाह जुळला. १८ मार्च रोजी साखरपुडा होऊ घातला होता. दरम्यान, वडील शहरात गेल्याने मुलीला घरी एकटी बघून अमरदीपने तिच्यावर अत्याचार केला. कुणाशी वाच्यता केल्यास विवाह संबंध मोडण्याची धमक्या देत त्याने महिन्यात चार ते पाच वेळा अत्याचार केला. याला कंटाळून अखेर १६ मार्च रोजी पीडित युवतीने मलकापूर शहर पो.स्टे.ला सायंकाळी तोंडी फिर्याद दिली. त्याची दखल घेत ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने आरो पीचा शोध घेत उशिरा रात्री खांडवीच्या जंगलातून ताब्यात घेऊन गजाआड केले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अमरदीप बाबुराव उमाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गवारगुरू करीत आहेत.

Web Title: Torture on the cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.