पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:50+5:302021-09-22T04:22:50+5:30

तेल्हारा : तालुक्यातील एका २७ वर्षीय विवाहितेला पतीचा अपघात झाल्याची बतावणी करून वाहनात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ...

Torture of married woman under the pretext of her husband's accident | पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार

पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार

Next

तेल्हारा : तालुक्यातील एका २७ वर्षीय विवाहितेला पतीचा अपघात झाल्याची बतावणी करून वाहनात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी दि.२० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

विवाहानंतर भाड्याच्या घरात राहायला गेलेल्या २७ वर्षीय विवाहितेशी वाहनात साहित्य आणताना आरोपी वाहनधारक राजकिरण हरिदास कांबळे (३५) (रा. विद्युत कॉलनी, पारस, ता. बाळापूर) याची ओळख झाली होती. आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेऊन एका दिवशी विवाहितेच्या घरी जाऊन पतीचा अपघात झाल्याचे सांगून सोबत चालण्यास सांगितले. भयभीत झालेल्या विवाहितेने आरोपीवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत वाहनात गेली. पातूर रस्त्याने जात असताना चाकूचा धाक दाखवून त्याने वाहनातच तिच्यावर अत्याचार केला तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. पीडिता तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असल्याने पीडितेने दि. २० सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी राजकिरण हरिदास कांबळे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे पुढील तपास करीत आहेत.

----------------------

अश्लील फोटो, शूटिंग काढून वारंवार अत्याचार

पीडित विवाहितेचे अश्लील फोटो काढून शूटिंग केली. याबाबत कुणाला सांगितल्यास बदनामीची धमकी दिली. भीतीपोटी विवाहितेने पतीला न सांगितल्याने आरोपीने विवाहितेवर पारस येथे दि. २ मार्च २०२० ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत वारंवार अत्याचार केला.

Web Title: Torture of married woman under the pretext of her husband's accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.