अकोल्यात घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Published: July 18, 2023 05:41 PM2023-07-18T17:41:15+5:302023-07-18T17:42:34+5:30

मूर्तिजापुरातील प्रतीकनगरात राहणाऱ्या अरुणा सुजय शेंदुरकर (४०) यांच्या तक्रारीनुसार, २०१० मध्ये सुजय उत्तमराव शेंदुरकर रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ याच्यासोबत त्यांचे लग्न झाले असून, त्याच्यापासून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.

Torture of wife for divorce in Akola, case registered against four | अकोल्यात घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोल्यात घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

अकोला : घटस्फोट देण्यासाठी दोन मुलांच्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मूर्तिजापुरातील प्रतीकनगरात राहणाऱ्या अरुणा सुजय शेंदुरकर (४०) यांच्या तक्रारीनुसार, २०१० मध्ये सुजय उत्तमराव शेंदुरकर रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ याच्यासोबत त्यांचे लग्न झाले असून, त्याच्यापासून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर पतीने माहेरहून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावला, परंतु विवाहिता पैसे आणत नसल्याने, पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. सासू सुनंदा उत्तमराव शेंदुरकर, दीर मंगेश व त्याची पत्नी कीर्ती मंगेश शेंदुरकर हेही शिवीगाळ करून पतीला प्रोत्साहन देत होते, तसेच पती सुजय शेंदुरकर हे घरातून निघून जा, घटस्फोट दे, असे म्हणून मारहाण करायचे. जीवे मारण्याची धमकी द्यायचे. विवाहितेने या प्रकरणात भरोसा सेलकडे तक्रार केली होती, परंतु दोन्ही कुटुंबीयांमध्ये तडजोड न झाल्यामुळे अखेर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Torture of wife for divorce in Akola, case registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.