असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 07:58 PM2017-11-26T19:58:26+5:302017-11-26T20:05:27+5:30

शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्‍चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

Towards Unorganized Construction Worker's Hometown - Guardian Minister | असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री

असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री

Next
ठळक मुद्देपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची ग्वाही बांधकाम कामगारांसाठी नोंदणीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला -असंघटीत बांधकाम कामगार हा बांधकाम आणि त्या अनुषंगाने  विविध क्षेत्रात सातत्याने राबत असतो, अशा कामगारांच्या व त्यांच्या  कुटुंबियांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ या  कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या  घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्‍चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, सहाय्यक  कामगार आयुक्त आणि अनुलोम, अग्निपंख व थॅलेसीमीया सोसायटी यांच्या  संयुक्त विदयामाने बांधकाम व्यवसाय व त्या अनुषंगाने इतर काम करणा-या  बांधकाम कामगारांसाठी नोंदणीचा मेळावा प्रमिलाताई ओक सभागृहात आज  पार पडला. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पाटील  बोलत होते. महापौर विजय अग्रवाल, थॅलेसीमीया सोसायटीचे अध्यक्ष  हरीषभाई अलीमचंदानी, मनपा उपायुक्त डॉ. पाटील, अग्नीपंख बहुउदेदशीय  संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, उर्जा पर्व फाउंडेशनचे संजय तिकांडे,  सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक बोरकर, नेहरु युवा केंद्राचे  उदय देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते. 
पालकमंत्री म्हणाले की, संघटीत कामगारांना विविध योजनांचा नेहमीच लाभ  मिळतो, परंतु वेगवेगळया बांधकाम क्षेत्रात सातत्याने कामाच्या माध्यमातून  योगदान देणा?्या असंघटीत बांधकाम कामगारांसाठीही शासनाच्या अनेक  योजना कार्यान्वित आहेत. लग्न, प्रसुती, मुलांचे शिक्षण, व्यवसाय उभारणी,  विमा सुरक्षा, पेन्शन यासाठी अनेकविध योजनांव्दारे कामगारांना सहकार्य केले  जाते, त्यामुळे असंघटीत बांधकाम कामगारांनी निराश होण्याचे कारण नाही.  सर्व योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा. याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातून  आपल्या क्षेत्रात निपुण असल्याचे प्रमाणपत्रही दिले जाईल, जेणेकरुन या  प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांना बाहेर देशातही चांगल्या वेतनावर काम मिळू  शकेल.    महापौर विजय अग्रवाल म्हणाले की, असंघटीत बांधकाम  कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण  मंडळाबरोबरचे महानगर पालिकाही झटत असते. मनपाकडून या कामगारांना  नोंदणी केल्यानंतर दोन दिवसांत नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच  वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाईल.
श्री. अलीमचंदानी म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी  असंघटीत बांधकाम कामगारांनी कामगार कार्यालयाकडे नोंदणी अवश्य  करावी. या कामगारांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटीबध्द आहे. प्रास् ताविकात डॉ. ओळंबे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे  आवाहन असंघटीत बांधकाम कामगारांना केले. श्री. बोरकर यांनी महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदीत बांधकाम  कामगारांसाठी सुरु असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विविध  योजनांच्या लाभार्थ्यांचा याप्रसंगी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते  गौरव करण्यात आला. आभार श्रीकांत एखंडे यांनी मानले. यावेळी मोठया सं ख्येने कामगारांची उपस्थिती होती. अनेक कामगारांनी यावेळी नोंदणी केली. 

Web Title: Towards Unorganized Construction Worker's Hometown - Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.