वाडेगावच्या ‘हायटेंशन-लाइन टॉवर’ग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडले गाऱ्हाणे
By atul.jaiswal | Published: April 2, 2018 04:01 PM2018-04-02T16:01:59+5:302018-04-02T16:01:59+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली.
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. दरम्यान पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांचे म्हणने एकुण घेतले व यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली.
महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या टॉवरमुळे व हायटेन्शन लाईनमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाय टेन्शन लाईन मुळे भविष्यात सुद्धा नापिकी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या ३१ मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार अपेक्षित पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम देण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली आहे. यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यां नी यापुर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सोमवार, २ एप्रिल रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात धाव घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढाचा वाचला. पालकमंत्री डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यां चे म्हणने ऐकून घेतले व यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल असा शब्द दिला. शेतकऱ्यां चे दोन प्रतिनिधी व युवासेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उपस्थितीत उर्जामंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नंतर शेतकऱ्यां नी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झुनका भाकरीचा आस्वाद घेतला.
या वेळी शेतकरी दीपक सरप, किसन गव्हाळे, जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिला सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर,गुलाम मोईन,अरुण मसने,वासुदेव सरप,श्रीराम हाडोळे, मंगेश धनोकार,केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धमार्ळे, महेबूब खान, विलास मानकर, जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसण गव्हाळे, पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप,नारायण उमाळे, कमलाबाई खोडके, रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप,शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकणार्बाई ढोरे,शेख सादिक,तोताराम धमार्ळे,दुगार्बाई भटकर, संजय कातखेडे,सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे,नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे, वैभव धमार्ळे आदी शेतकर्?्यांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले. यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख नितीन मिश्रा,जिल्हा समन्वयक निखील ठाकुर,सागर चव्हाण,आकाश बोराळे,रणजीत गावंडे,प्रतिक देशमुख,सौरभ नागोशे आदींची उपस्थिती होती.