रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर ‘ट्रॅकर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:28 AM2020-07-18T10:28:33+5:302020-07-18T10:28:42+5:30

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४ ...

'Tracker' on medical vehicles including ambulances! | रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर ‘ट्रॅकर’!

रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर ‘ट्रॅकर’!

Next

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४ हजार ८२१ वाहनांवर जीपीएस, जीपीआरएस प्रणाली अंतर्गत ट्रॅकर बसविण्यात येणार आहे. हा उपक्रम बाह्य यंत्रणेच्या साहाय्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय रुग्णवाहिका, मोबाइल मेडिकल युनिट वाहने, आरोग्य विभाग, पर्यवेक्षीय वाहने तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या एकूण ४ हजार ८२१ वाहनांवर ‘जीपीएस’ किंवा ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविली जाणार आहे. यासोबतच राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णावाहिकांचे आरक्षण व मोबाइल मेडिकल युनिटचे ट्रॅकिंग करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करणे, तसेच १०२ कॉल सेंटर चालविण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्यासंदर्भात राज्य शासनाने गुरुवारी शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार, राज्यातील ४,८२१ वैद्यकीय वाहनांवर ट्रॅकर बसविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. त्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. यासंदर्भात पुढील निर्देश आल्यावर जिल्हास्तरावर कार्यवाही करू.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: 'Tracker' on medical vehicles including ambulances!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.