शेतातील भुईशेंग पिकावर फिरवला टॅक्टर
By admin | Published: June 1, 2017 09:56 PM2017-06-01T21:56:06+5:302017-06-01T21:56:17+5:30
उत्पन्नाच्या तुलनेत मिळणारा भाव पाहता खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतक-याने शेताततील भुईशेंगच्या उभ्या पिकावर टॅक्टर फिरवला.
Next
आॅनलाइन लोकमत/ विजय शिंदे
आकोट, दि.01- उत्पन्नाच्या तुलनेत मिळणारा भाव पाहता खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतक-याने शेताततील भुईशेंगच्या उभ्या पिकावर टॅक्टर फिरवला.
आकोट तालुक्यातील मौजे बोचरा शेतशिवारात गुरुवारी हा प्रकार घडला. रूईखेड येथील शेतकरी संजय अजाबराव शेलकर यांनी जानेवारीमध्ये चार एकरात भुईशेंग पेरली.सतत मेहनत घेत पाणी देऊन मशागत केली.अंदाजे 80 हजार रूपये लागवडीवर खर्च केला असावा. परंतु शेंग परिपक्व झाली असताना बाजारात मात्र भाव पडले. त्यामुळे खर्च सुध्दा निघणार नसल्याने शेतकरी धास्तावला. अशातच खरीप हंगाम तोडांवर असताना भुईशेंग शेतात ठेवणे पडवणारे नाही. तर भाव मिळत नसल्याने अखेर शेतशिवारातील चार एकर भुईशेंग पिकावर टॅक्टर फिरवला.
लागवडीचा खर्च निघण्याची शक्यता धुसर होती. सध्या बाजार हमीदरापेक्षा भुईशेंगला 2 हजारा एवढा भाव मिळत आहे. विविध कारणे देत व्यापारी शेतकरीची लूट करत आहे. अशातच भाव पाहता शेतातील भुईशेंग काढणीचा खर्च निघणे कठीण दिसत होते. त्यामुळे शेलकर या शेतकरी बांधवाने उभ्या पिकावर टॅक्टर फिरवित भुईमुग मोडला आहे. शेतात रात्रदिवस परिश्रम घेणारा शेतकरीला हमीभाव मिळत नसल्याने पीक पेरणी करून मोडावे लागत आहेत.