मूर्तिजापूर बाजार समितीमधील एक कोटीचा माल घेऊन खरीददार पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:21 PM2019-02-12T14:21:34+5:302019-02-12T14:21:40+5:30
मूर्तिजापूर: तीन महिन्यांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचे सोयाबीन खरेदी करून वर्धा येथील खरीददार महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास अजाबराव काकड हा अडत्यांचे ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचे धान्य खरेदी करून पसार झाला आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर: तीन महिन्यांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचे सोयाबीन खरेदी करून वर्धा येथील खरीददार महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास अजाबराव काकड हा अडत्यांचे ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचे धान्य खरेदी करून पसार झाला आहे. या कारणासाठी अडत्यांनी गत शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धन्य बाजार बेमुदत बंद ठेवला आहे.
वर्धा येथील महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास काकड यांनी मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचा तीन महिन्यांपूर्वी सोयाबीन माल खरेदी केला होता. या संदर्भात येथील अडत्यांनी पैशाची मागणी केली; परंतु अडचण समजून न घेता उडवाउडवीची उत्तरे अडत्यांना देण्यात आली. आतापर्यंत अडत्यांनी कैलास काकड यांना ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचा माल दिला. त्या पोटी अडत्यांना काकड यांच्याकडून बाकी घेणे होते. आजपर्यंत अडत्यांनी शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून पैशाचे चुकारे केले; परंतु अडत्यांचे १ कोटीच्या जवळपास पैसे अडकून पडल्याने शेतकºयांचा माल खरेदी करण्यासाठी अथवा शेतकºयांना देण्यासाठी पैसे नसल्याने अडत्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य खरेदी बेमुदत बंद ठेवली आहे. सोमवारी २८ अडते वर्धा येथे गेले असता रिकाम्या हाताने परत आले. यापुढे उपरोक्त खरीददारावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय येथील अडत्यांनी घेतला असल्याचे समजते.
१० फेब्रुवारी रोजी अडते आणि खरीददार यांची बैठक घेण्यात आली. या प्रकरणात बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी असून, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे; परंतु हा वाद अडते आणि खरीददार यांच्या मधला आहे. तरीसुद्धा समिती अडत्यांना योग्य सहकार्य करेल. बैठकीमध्ये येत्या बुधवारपासून धान्य बाजार नियम सुरू करण्यात असल्याचा निर्णय झाला आहे.
- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर
वर्धा येथील खरीदार कैलास काकड यांनी आमचा सोयाबीन माल खरेदी करून मालाचे पैसेच दिले नसल्याने आमचा अडते वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. यामुळे शेतकºयांना पैसे देण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे धान्य बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पैसे मिळाले नाही तर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात येईल.
- प्रकाश सोमाणी, अडते, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर