सेंट पॉल अकॅडमी निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:27+5:302021-07-18T04:14:27+5:30
------------------------- भोपळे विद्यालयाचा १०० टक्के निकाल हिवरखडे : नुकताच अमरावती विभागीय मंडळाचा ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झालेला आहे. या ...
-------------------------
भोपळे विद्यालयाचा १०० टक्के निकाल
हिवरखडे : नुकताच अमरावती विभागीय मंडळाचा ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झालेला आहे. या निकालात हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सन २०२०-२१ या सत्रात बोर्ड परीक्षेकरिता वर्ग दहावी मधील एकूण १३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या निकालात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यात ६४ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी, ६३ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण झालेले आहेत. या उत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक सत्यदेवराव गिऱ्हे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, सहकार्यवाह श्यामशील भोपळे, आदी समस्त संस्थेचे पदाधिकारी यांनी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांची कौतुक केले आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका तथा वर्गशिक्षिका कु. रंजना अंजनकर, पर्यवेक्षिका कु. रजनी वालोकार, वर्गशिक्षक प्रशांत भोपळे, विषय शिक्षक रंजित राठोड, अभिजित भोपळे, श्रीकांत परनाटे, श्रीकांत दही व प्रा. संतोषकुमार राऊत व पालकांना देतात.