अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतुकीला खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 01:51 PM2019-09-09T13:51:40+5:302019-09-09T13:52:05+5:30
अतिक्रमकांचा प्रचंड हैदोस असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.
- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोडवर अतिक्रमकांचा प्रचंड हैदोस असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे महापालिक ा प्रशासनाची डोळेझाक असल्याने वाहतूक पोलिसांनाही अतिक्रमक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
गांधी रोडवर मुख्य बाजारपेठ असल्याने वाहन चालकांची मोठी गर्दी असते. या रोडवर फेरीवाल्या अतिक्रमकांनी मोठा वेडाच घातल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गांधी चौक ते सिटी कोतवाली हा रस्ता ‘वन वे’ करण्यात आला असला तरी मात्र योग्य नियोजन नसल्याने या रस्त्यावर नेहमीच जाम लागलेला असतो. याकडे वाहतूक पोलिसांसह सिटी कोतवाली पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अशातच महापालिकेच्या आशीर्वादाने अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरून वाहने चालविण्यास जागाच बाकी नसल्याचे वास्तव आहे. गांधी चौकात चौपाटी तसेच हातगाड्यांचे मोठे अतिक्रमण असल्यानेही या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, पोलीसही हैराण झाले आहेत. पेरण्यांची लगबग सुरू होणार असल्याने टिळक रोडवरील आता शेतकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. अशातच या रोडचे बांधकाम सुरू असल्याने बी-बियाणे, खते आणि कीटकनाशक ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार यात शंका नाही. वाहतूक पोलिसांचेही या रोडवरील बेताल वाहतुकीकडे दुर्लक्ष आहे.
रस्त्याच्या बांधकामाने नागरिक बेहाल
टिळक रोडसह रेल्वे स्टेशन ते जेल चौक परिसरात उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या दोन्ही रोडच्या बाजूला प्रचंड मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी टाकण्यात आले आहे. या रोडवर गत पावसाळ्यात प्रचंड चिखल झाल्याने यामध्ये बसून शिवसेनेचे सागर भारुका यांनी आंदोलन छेडले होते. या दोन्ही रोडवर रोजच अपघात होत असून, रविवारीही एक मुलगा खाली कोसळून गंभीर जखमी झाला.
कंत्राटदाराची मनमानी; धुळीचे साम्राज्य
सिटी कोतवाली ते शिवाजी महाविद्यालय तसेच मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील उडाण पूल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून, या रस्त्याचे बांधकाम करणाºया कंत्राटदाराची प्रचंड मनमानी सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, प्रचंड धूळ होत असल्याने वाहनांमध्ये अपघात होत आहेत. दोन बाजंूनी करण्यात आलेल्या रस्त्याच्या मध्ये चर किंवा कपार असल्याने त्यावर वाहने स्लिप होत असून, रोजच अपघातात काही जण जखमी होत आहेत.