वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:19 PM2020-01-15T13:19:38+5:302020-01-15T13:19:43+5:30
वेगाने वाहने चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात १०० च्या वर कारवाया करण्यात आल्या.
अकोला: शहर वाहतूक शाखेद्वारा रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत वेगाने वाहन चालविणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे, तसेच अशा वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येत आहे.
शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रबोधनाच्या कार्यक्रमांसोबतच वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदर रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश रस्त्यावरील अपघात कमी करण्याचा प्रयत्न आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी महामार्गावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने वेगाने वाहने चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात १०० च्या वर कारवाया करण्यात आल्या. या वाहनचालकांकडून १ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहनावर बसविण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंधारात रस्त्यावर चालणारी किंवा उभी असलेली बैलबंडी दिसावी म्हणून बैलगाडी तसेच ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी राबविली.