अकोला शहरातील वाहतुकीची कोंडी फुटणार

By admin | Published: October 2, 2015 02:22 AM2015-10-02T02:22:10+5:302015-10-02T02:22:10+5:30

कायमस्वरू पी तोडगा काढण्यासाठी महापौर, आयुक्त सरसावले; ९ ऑक्टोबरला बैठक.

The traffic congestion in Akola city can be broken | अकोला शहरातील वाहतुकीची कोंडी फुटणार

अकोला शहरातील वाहतुकीची कोंडी फुटणार

Next

अकोला : अशोक वाटीका चौकातील बालकाचा अपघात त्यांनतर मुख्य बसस्थानक या वदर्ळीच्या चौकात ट्रकच्या अपघातात महिलेच्या ह्दयद्रावक मृत्युनंतर महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले असून, शहरातील बेताल वाहतूक, जडवाहनांची होणारी गर्दी, नागरिसमस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या महापौर व आयुक्तांनी या संदर्भात गुरू वारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी या अत्यावश्यक समस्येवर तोडगा काढण्यासाठी येत्या ९ ऑक्टोबरला बैठकीचे आयोजन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एकवटलेली बाजारपेठ, जुन्या व नवीन बसस्थानकावरील गाड्यांच्या फेर्‍या, जड वाहतूक व ऑटोचालकांच्या मनमानीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेताल वाहतुकीमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महापौर उज्ज्वला देशमुख, आयुक्त अजय लहाने यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेतली. शहरातील बेताल वाहतूक आणि वाहतूक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मदनलाल धिंग्रा चौकात घडलेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. जड वाहतुकीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. यात भरीस भर शहराची संपूर्ण मुख्य बाजारपेठ मध्यवर्ती भागात एकवटल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसणे, चक्क रस्त्यावर अतिक्रमकांनी दुकान थाटणे तसेच मुख्य चौका-चौकांत ऑटो चालकांनी निर्माण केलेले अवैध थांबे अकोलेकरांच्या जीवावर उठले आहेत. जुन्या बसस्थानकासह मध्यवर्ती बसस्थानकावरील एसटीच्या फेर्‍या, अरुंद रस्ते व जड वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन चालण्याची वेळ अक ोलेकरांवर आली आहे. या समस्या एका दिवसात निर्माण झाल्या नसल्या तरी यावर ठोस उपाय शोधण्याची वेळ महापालिका, पोलीस प्रशासनासह संबंधित यंत्रणेवर आली आहे. याकरिता महापौर उज्ज्वला देशमुख, आयुक्त अजय लहाने यांनी पुढाकार घेत, गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असता, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी ९ ऑक्टोबर रोजी संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

Web Title: The traffic congestion in Akola city can be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.