धिंग्रा चौकात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:42+5:302021-02-11T04:20:42+5:30

पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर अकोला : पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करण्यास मनाई असतानाही अनेक दुचाकीस्वार पेट्रोल भरताना फोनवर बोलताना दिसून येतात. ...

Traffic jam at Dhingra Chowk | धिंग्रा चौकात वाहतुकीची कोंडी

धिंग्रा चौकात वाहतुकीची कोंडी

Next

पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर

अकोला : पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करण्यास मनाई असतानाही अनेक दुचाकीस्वार पेट्रोल भरताना फोनवर बोलताना दिसून येतात. हा प्रकार धोकादायक ठरत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून, अशांविरुद्ध कारवाईची गरज आहे.

अखेरच्या टप्प्यातील हरभऱ्याची काढणी सुरू

अकोला : रब्बी हंगामात उशिरा पेरलेला हरभरा अखेरच्या टप्प्यात आला असून, अनेक ठिकाणी काढणीला सुरुवात झाली आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात थंडी वाढल्याने हरभऱ्यासाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

शहरातील नाले तुंबले

अकोला : शहराच्या विविध भागांतील नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाले तुंबले आहेत. बाळापूर रोडवरील मुख्य नाल्याची अनेक दिवसांपासून सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाल्यात घाण साचली असून डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे.

धुळीचे प्रमाण वाढले

अकोला : अकोला शहरासह जवळपासच्या महामार्गाचे निर्माण कार्य सुरू असल्याने सर्वत्र धूळ पसरली आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा जाेर वाढला आहे. त्यामुळे शहरातील धूळ अस्थमाच्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. अशा रुग्णांनी धुळीपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बस फेऱ्या अनियमित

अकोला : लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली, मात्र अजूनही अनेक ग्रामीण भागात बस फेऱ्या अनियमित सुरू आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. ग्रामीण भागात नियमित बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Traffic jam at Dhingra Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.