जयहिंद चौकात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:35+5:302020-12-30T04:24:35+5:30

नदीपात्रात अस्वच्छता अकोला: शहरातील मुख्य नाल्या मार्णा नदीपात्रात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश घाण पाणी नदीपात्रात जमा होते. ...

Traffic jam at Jayhind Chowk | जयहिंद चौकात वाहतुकीची कोंडी

जयहिंद चौकात वाहतुकीची कोंडी

Next

नदीपात्रात अस्वच्छता

अकोला: शहरातील मुख्य नाल्या मार्णा नदीपात्रात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश घाण पाणी नदीपात्रात जमा होते. शिवाय, अनेक लोक नदीपात्रातच कचरा टाकत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला असून, नदी जवळील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गायगाव मार्गावर रस्त्यावर धूळ

अकोला: डाबकी रोडमार्गे गायगावकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले आहे. रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने या भागात धुळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहनधारकांना या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. हा त्रास पाहता सोमवारी या मार्गावर पाणी टाकण्यात आले होते.

बसस्थानकावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

अकोला: एसटी महामंडळाच्या आगार क्रमांक एक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे; मात्र या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक जण विनामास्क बसमध्ये बसल्याचे दिसून येतात. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही.

जीएमच्या विद्यार्थ्यांकडून रक्तदान

अकोला: कोरोनाच्या काळात रक्तसंकलन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू लागला असून रक्ताअभावी गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता शासनामार्फत रक्तदानाचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रक्तदान केले जात आहे.

गहू, हरभरा पिकात वन्य प्राण्यांचा हैदोस

अकोला: सध्या शेतात रब्बी हंगामाचे गहू आणि हरभरा पीक असून, शेतकऱ्यांना या पिकांपासून मोठी आशा आहे, परंतु वन्य प्राण्यांनी हैदोस करत पीक फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. गत वर्षभरात नैसर्गिक आपत्ती आणि बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे एटीएम बंद

अकोला: तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी शहरातील विविध भागातील एटीएम बंद पडले हाेते. त्यामुळे बँक ग्राहकांची मोठी अडचण झाली. काही बँकांचे एटीएम सुरू होते, मात्र त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. तसेच काही एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे चित्र दिसून आले.

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बँँकांमध्ये गर्दी

अकोला: नाताळ निमित्त शुक्रवारी सर्वच बँकांना सुट्टी होती. त्याला लागूनच शनिवार आणि रविवार आल्याने सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद होते. तीन दिवसानंतर सोमवारी बँका उघडल्याने बँकांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. बँक ग्राहकांकडून मात्र फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेताना दिसून आले नाही.

Web Title: Traffic jam at Jayhind Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.