ट्राफिक पॉईंट झाले वसुलीचे अड्डे!

By admin | Published: July 6, 2014 07:42 PM2014-07-06T19:42:03+5:302014-07-06T19:42:03+5:30

महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेच्या विभागाकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याने महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट पोलिसांसाठी वसुलीचे अड्डे बनले आहेत.

Traffic Point Recovery Offices! | ट्राफिक पॉईंट झाले वसुलीचे अड्डे!

ट्राफिक पॉईंट झाले वसुलीचे अड्डे!

Next

अकोला: पावसाला अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्गावर डझनावर ट्राफिक पॉईंट आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. यामध्ये जड, अतिजड वाहनेसुद्धा असतात. पासिंग शुल्काच्या नावाखाली महामार्गावरील वाहनचालकांकडून दररोज महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेच्या विभागाकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याने महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट पोलिसांसाठी वसुलीचे अड्डे बनले आहेत. गुरुवारी एसीबीने केलेल्या कारवाईनंतर तर यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.
महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंटवर रुजू होण्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. त्यामागे कारणही तसेच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट हे कमाईचे मोठे साधन आहे. वाहने अडवून त्यांच्याकडून पासिंग शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची चिरीमिरी घेतल्या जाते. राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांना पोलिस ठाणे आणि ट्रॅफिक पॉईंटवरील अधिकारी, कर्मचार्‍यांचे खिसे गरम केल्याशिवाय पुढेच जाऊ देत नसल्याचे चित्र दररोजचेच आहे. या सर्व प्रकारामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत सगळेच गुंतलेले असतात. वाहनचालकांकडून वसूल केलेली चिरीमिरीनंतर हे लोक आपसात वाटून घेतात. वाहनचालकही उगाच वाद नको म्हणून रक्कम देऊन पुढचा मार्ग धरतात.

Web Title: Traffic Point Recovery Offices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.