नऊ महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांची ६३ हजार वाहन चालकांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:38 PM2019-01-02T12:38:42+5:302019-01-02T12:39:09+5:30
अकोला : पोलीस शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये शहरातील ६३ हजार ५६७ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत १ कोटी ५८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.
अकोला : पोलीस शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये शहरातील ६३ हजार ५६७ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत १ कोटी ५८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.
शहर वाहतूक नियंत्रक शाखेने २0१७ मध्ये एकूण ५७ हजार ३१९ वाहन चालकांवर कारवाई करून १ कोटी ४३ लाख ८0 हजार रुपये दंड वसूल केला. यंदा वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम राबविल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ६ हजार ५६७ अधिक वाहन चालकांवर कारवाई केली. कारवाईची मोहीम राबविल्यामुळे यंदा दंडाच्या महसुलातसुद्धा वाढ झाली आहे. १५४४ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून वाहतूक पोलिसांनी २0१७ मध्ये ३0 लाख १0 हजार ३00 रुपये दंड वसूल केला होता. २0१८ मध्ये यात वाढ झाली. अवैध प्रवासी वाहतुकीच्या १७८८ केसेस करून ३२ लाख ५१ हजार ४00 रुपये दंड वसूल केला. या वर्षात वाहन परमिट रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे ८0 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. शहर वाहतूक शाखेने ४९ वाहन परमिट रद्द केले. मोबाइलवर संभाषण करणाºया ३४ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणारे नऊ चालकांविरुद्ध कलम १८५ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
आठ हजार वाहनांवर लावले रिफ्लेक्टर!
पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शहरात अपघात प्रवण स्थळ, नो हॉर्न, शाळा समोर आहे, वाहन हळू चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करू नये, ओव्हर टेकिंग करू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये, असे ५२ फलक मुख्य चौकात लावण्यात आले. ११२ शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांचे ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून संरक्षण व्हावे, या दृष्टिकोनातून ८ ट्रॅफिक आयरलेंड ट्रॅफिक बुथ उपलब्ध केले आहेत, तसेच वर्षभरात ८ हजार दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात आले.