पावसाळ्यात वाहतूक होते ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:39+5:302021-08-26T04:21:39+5:30
अकोला-कंचनपूर-हातरूण-अकोट हा मार्ग अकोला-निंबाफाटा-अकोट मार्गाला समांतर मार्ग असून, कमी अंतराचा आहे. त्यामुळे अकोला-कंचनपूर-हातरूण मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, या ...
अकोला-कंचनपूर-हातरूण-अकोट हा मार्ग अकोला-निंबाफाटा-अकोट मार्गाला समांतर मार्ग असून, कमी अंतराचा आहे. त्यामुळे अकोला-कंचनपूर-हातरूण मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, या मार्गाची काही भागात अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गाने चालणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात या मार्गाने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. पावसाळ्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगर-उगवादरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याचे बुधवारी दिसून आले.
--------------------------
कारंजा (रम) - अकोला रस्त्यावर अपघाताचा धोका!
नया अंदुरा : बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर-हातरूण - अकोला असा ३० किलोमीटर रस्ता आहे. त्यापैकी १४ किमी डांबरीकरण असलेला रस्ता पूर्णपणे उखडला असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे खूप कठीण झाले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून नेहमी पाणीचपाणी राहते. रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत.
-------------------------------
एक ते दीड फूट खोल खड्डे
मालवाडाफाटा-लोणाग्राफाटा या रस्त्यावर तब्बल एक ते दीड फूट खोल असलेले मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या मार्गाने कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.
-------------------------------
कारंजा रमजानपूर-हातरूणमार्गे अकोला रस्त्याने डांबरीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जात असताना बऱ्याच वेळा अपघात होतात. रस्त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे हाल होत आहे.
- नारायण साबळे, माजी सैनिक, नया अंदुरा
----------------------------------
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या हलगर्जीमुळे रस्त्यांचे तेरा वाजले आहेत. रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी.
-सुबोध गवई, लोणाग्रा