तलावात बुडून शिक्षकाचा करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:49+5:302021-06-03T04:14:49+5:30

अकोट पंचायत समितीअंतर्गत गरसोळी येथील जिल्हा परिषद शिक्षक गजानन विखे हे स्थानिक हनुमान नगर येथील रहिवासी आहेत. सध्या लॉकडाऊन ...

The tragic end of the teacher drowning in the lake | तलावात बुडून शिक्षकाचा करूण अंत

तलावात बुडून शिक्षकाचा करूण अंत

Next

अकोट पंचायत समितीअंतर्गत गरसोळी येथील जिल्हा परिषद शिक्षक गजानन विखे हे स्थानिक हनुमान नगर येथील रहिवासी आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने शिक्षक मित्रांसोबत धारुळ - रामापूर येथील तलावावर गेले होते. तलावात गजानन विखे बुडाल्याच्या घटनेची माहिती त्यांच्या सोबत असलेल्या शिक्षकांनी दिली. घटनास्थळावर अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व गावकरी दाखल झाले होते. यावेळी शिक्षक गजानन विखे यांचा तलावातील पाण्यात शोध घेण्यासाठी गोताखोरांचे सहकार्य घेण्यात आले. सायंकाळपर्यंत मृतदेहाचा शोध लागला नव्हता. रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. शिक्षक गजानन विखे हे मनमिळाऊ स्वभावाचे व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांची पत्नीसुध्दा रोहणखेड येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा, मुलगी आहे.

फोटो:

Web Title: The tragic end of the teacher drowning in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.