२६00 अधिका-यांना प्रशिक्षण

By admin | Published: February 16, 2017 10:17 PM2017-02-16T22:17:36+5:302017-02-16T22:17:36+5:30

अकोला कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मनपाची कार्यशाळा.

Training to 2600 officers | २६00 अधिका-यांना प्रशिक्षण

२६00 अधिका-यांना प्रशिक्षण

Next

अकोला, दि. १६- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी अशा एकूण २ हजार ६00 अधिकारी-कर्मचार्‍यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्यावतीने बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दुसरी कार्यशाळा पार पडली.
मनपा क्षेत्रातील २0 प्रभागांमधून ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी मतदान तसेच २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. यासाठी ५८७ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची संख्या पाहता प्रशासनाने केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी यांचा समावेश असलेल्या ६५0 पथक ांचे गठन करण्यात आले. यामध्ये एकूण २ हजार ६00 अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश असून, कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निवडणूक निर्णय अधिकारी पी.ए. तट्टे, श्रीकांत देशपांडे, ए.पी. मोहोड, डी.एम. पालोदकर, मनपा उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, प्रज्ञा खंडारे, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे तसेच क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेचे संचालन अनिल बिडवे यांनी केले. कार्यशाळा कामकाजाची जबाबदारी निवडणूक विभागाचे गणेश टाले, अरुण पाचपोर, गजानन मुर्तळकर, सुधीर मालटे, संजय चव्हाण, भरत शर्मा, कैलास ठाकूर, सतीश वखारिया, राजेश कोंडाणे, राजेश जाधव, दिनेश मेहरे, पूर्णाजी पाटील, पुरुषोत्तम इंगळे, रवींद्र शिंदे व सुहास लडिकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

१0७ अधिकारी-कर्मचार्‍यांची अनुपस्थिती

दोन सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी १0 ते दुपारी १ पर्यंतच्या पहिल्या सत्रात ३९0 पथकांतील १ हजार ५६0 मतदान अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी १ हजार ४८६ जणांनी उपस्थिती लावली, तर दुपारी २ ते ५ पर्यंतच्या कालावधीत आयोजित केलेल्या दुसर्‍या सत्रात २६0 पथकांतील अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी १ हजार नऊ अधिकारी-कर्मचार्‍यांनी हजेरी लावली. मनपाच्या दुसर्‍या कार्यशाळेला १0७ अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित होते.

इव्हीएमबद्दल दिली माहिती

कार्यशाळेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी यांना महापालिका आयुक्त अजय लहाने, निवडणूक निर्णय अधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त तथा नोडल अधिकारी समाधान सोळंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतदान यंत्राचा वापर क सा करायचा, यासह मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. ही माहिती चलचित्रपटाद्वारे देण्यात आली. मतदान यंत्राबाबत प्रशांत बुले यांनी सविस्तर माहिती विशद केली.

Web Title: Training to 2600 officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.