डॉ. पंदेकृविचे ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण; कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:22 PM2018-04-02T16:22:11+5:302018-04-02T16:22:11+5:30
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यां ना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगावर लक्ष देण्यासाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून आतापर्यंत अनेक गावात शेतकरी व महिला बचत गटांनी प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.
शुक्रवारी कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू तसेच बिलासपूर छत्तीसगढच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. के. साहू, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. भाले यांनी ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडविण्यासाठी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मितीची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, कृषी प्रक्रिया उद्योगांचे तंत्रज्ञान अनेक गावांत उपलब्ध करू न दिले आहे. डॉ. बोरकर यांनी तंत्रज्ञानाबाबत जागरू कता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. शेतीत उत्पादन घेण्यासोबतच शेतातील कच्च्या मालावर कमी खर्चात प्रक्रिया केल्यास उत्पन्नामध्ये भर पडते. त्यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. नागदेवे यांनी कौशल्य विकसित व्हावे व जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभे राहून शेतकरी सक्षम व्हावा, असे प्रयत्न आहेत. म्हणूनच कडधान्य प्रक्रिया तंत्रज्ञान व कडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण फायद्याचे असल्याचे ते म्हणाले.