धामोरी येथे माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:41+5:302021-04-28T04:20:41+5:30
सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोजन, प्रमाणवायू, नत्र, स्फूरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर ...
सर्वसाधारणपणे पिकास कर्ब, हायड्रोजन, प्रमाणवायू, नत्र, स्फूरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनीचे माती परीक्षण करून घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणाऱ्या शिफारशीप्रमाणे खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कोणती पिके घ्यावीत, शिफारशीनुसार खतांची मात्रा किती प्रमाणात द्यावीत, नत्र स्फुरद, पालाशची कमतरता असेल तर काय करावे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर कसे नियोजन करावे, गांडूळ खत, सेंद्रियखत, हिरवळीचे खते द्यावीत. जमिनीचा पीएच किती असावा, जमिनीमध्ये आम्ल कमी असेल तर काय करावे, पाण्याच्या अति वापरामुळे जमिनीचे गुणधर्म बिघडतात, असे सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे अकोला जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे, कार्यक्रम सहायक प्रशांत वाहिले यांनी केले.
फोटो: