मतदान केंद्राध्यक्ष, अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:43 PM2019-03-11T12:43:55+5:302019-03-11T12:44:23+5:30
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाºयांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात १ हजार २०० अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग घेतला.
अकोला लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून विविध विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदारसंघनिहाय निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये १० मार्च रोजी अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांचे कर्तव्य तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात १ हजार २०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.