ग्राम विकास आराखड्यांचे जिल्हा परिषद खातेप्रमुखांना प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:31+5:302020-12-09T04:14:31+5:30
अकोला: राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम विकास आराखडे तयार करण्याच्या विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या ...
अकोला: राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम विकास आराखडे तयार करण्याच्या विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राहूल शेळके, सूरज गोहाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्राम विकास आराखडा कसा तयार करावा, त्याचे नियोजन कसे करावे, आमचा गाव आमचा विकास या विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृषी विस्तार अधिकारी रोहिदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी विनोद सोनवणे यांनी केले.