अकोला जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांचा बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 10:50 IST2021-08-21T10:50:03+5:302021-08-21T10:50:09+5:30
Transfer of police inspectors in Akola district : स्थानिक गुन्हे शाखा या चर्चेतील जागेसाठी संतोष महल्ले यांची तर वाहतूक नियंत्रण शाखेत विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांचा बदल्या
अकोला : जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाहेर बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. दोन अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा या चर्चेतील जागेसाठी संतोष महल्ले यांची तर वाहतूक नियंत्रण शाखेत विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील चार ठाणेदारांची बदली जिल्ह्याबाहेर झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेसह वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षकांचे पद रिक्त झाले होते. खदानच्या पोलिस निरीक्षकांचे पदही रिक्त होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.२०) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केल्यात.
जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार शुक्रवारी बदली आदेश देण्यात आले.
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, अकोला
नाव कठून काेठे
संतोष महल्ले अकोट शहर स्थागुशा प्रभारी
भानुप्रताप मडावी सिव्हिल लाईन्सचे पोलिस निरीक्षक मुदतवाढ
गजानन महल्ले रामदासपेठचे पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष
प्रकाश अहिरे नियंत्रण कक्ष अकोट शहर
विलास पाटील दहशतवाद विरोधी पथक शहर वाहतूक शाखा
श्रीरंग सणस नियंत्रण कक्षातील खदान पोलिस स्टेशन
नितीन देशमुख . तेल्हारा अकोट ग्रामीण चे प्रभारी
ज्ञानोबा फड अकोट ग्रामीण तेल्हारा पोलिस निरीक्षक
उज्ज्वला देवकर सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी
संजय गवई खदानमधून रामदापेठ
शेख रहिम गफार मूर्तिजापूर ग्रामीणमधून जुने शहर अकाेला
ज्योती विल्हेकर अकोट शहर मुदतवाढ
सुरेंद्र राऊत रामदासपेठ दहिहांडा ठाणेदार म्ह
..................