जिल्हा परिषदेत बदल्यांचा पोळा फुटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:40 PM2019-05-05T13:40:53+5:302019-05-05T13:40:58+5:30
अकोला : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया १३ ते १५ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पाडली जाणार आहे.

शासन निर्णयानुसार बदलीसाठी विनंती अर्ज सादर करणाºयांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पक्षाघाताने आजारी, अपंग कर्मचारी, गतिमंद मुलांचे पालक, ह्रदय शस्त्रक्रिया, एकच मूत्रपिंड असलेले, डायलिसिस सुरू असलेले, कर्करोगी, आजारी, सैनिक-अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, घटस्फोटीत महिला कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण, शासनमान्य संघटनेचे पदाधिकारी यांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेळापत्रकानुसार १३ मे रोजी क्रमानुसार सकाळी बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन विभागातील बदल्या होणार आहेत, तर १४ मे रोजी क्रमानुसार सकाळी पंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागातील बदल्या होणार आाहेत. तर १५ मे रोजी सकाळी शिक्षण विभाग, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील बदल्या होणार आहेत. विनंती अर्ज सादर करणारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.