जिल्ह्यातील ३३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 04:38 PM2020-07-22T16:38:07+5:302020-07-22T16:38:15+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली.
अकोला : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध शाखेतील तब्बल ३३८ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली असून, बदली झालेल्या कर्मचाºयांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोला जिल्हा पोलीस दलात एका ठिकाणी पाच वर्षांपेक्षा तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते; मात्र त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. नंतर राज्य शासनाने प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील विविध शाखेत कार्यरत असलेल्या तसेच एकाच पोलीस ठाण्यात किंवा एकाच शाखेत पाच वर्ष तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची माहिती मागवली होती. यासोबतच प्रशासकीय कारणावरून त्यांच्या बदल्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पंधरा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यातील विविध शाखेत कार्यरत असलेल्या तब्बल ३३८ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार बदली झालेल्या कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीनशे पोलीस कर्मचाºयांच्या लवकरच बदल्या होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत'ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. त्यानंतर या बदल्यांसाठी पाच पर्याय मागविल्याने अनेकांच्या मसुद्यावर पाणी फेरण्याचेही वृत्त ‘लोकमत'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाºयांची एकाच ठिकाणी ठाण मांडून पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांची बदली करून त्यांना इतरत्र हलविले आहे. यावरून पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी या बदल्या अभ्यासपूर्ण केल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.