अकोल्यात पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 03:26 PM2017-11-08T15:26:44+5:302017-11-08T15:30:02+5:30
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कलासगर यांनी मंगळवारी रात्री जिल्ह्यातील ठाणेदारांचे खांदेपालट केले आहे. यासोबतच काही सहायक पोलिस निरीक्षक यांच्याही बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकानी दिले असून त्यांना तातडीने रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.
- सचिन राऊत
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कलासगर यांनी मंगळवारी रात्री जिल्ह्यातील ठाणेदारांचे खांदेपालट केले आहे. यासोबतच काही सहायक पोलिस निरीक्षक यांच्याही बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकानी दिले असून त्यांना तातडीने रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या बदलयामध्ये मूर्तिजापूर शहरचे ठाणेदार गजानन पडघन यांची जुने शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांचे जागेवर प्रदीप देशमुख यांना देण्यात आले आहे. जुने शहरच ठाणेदार विनोद ठाकरे यांना बाळापूर ठाणेदारपदी बदली देण्यात आली आहे.
नियंत्रन कक्षातील संजीव राऊत याना अकोट फाईल पोलीस ठाण्याचे ठाणेदारकी देण्यात आली असून तिरुपती राणे यांना
बार्शीटाकळी पोलीस स्टेशन च्या ठाणेदारपदी बदली देण्यात आली आहे. चानींचे वादग्रस्त ठाणेदार वैभव पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून गजानन खारडे यांना चांनी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. बार्शी टाकळी चे ठाणेदार सतीश पाटील यांची जुने शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पिंजरचे ठाणेदार सुनील साळुंके यांची सिविल लाईन्स पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नंदकिशोर नागलकर यांना बदली देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षत कार्यरत असलेले प्रेमानंद कात्रे यांची रामदास पेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पातूर पोलिस स्टेशनमध्ये बदली झालेले प्रकाश झोडगे यांची पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारीच पदभार स्वीकारला असून कामकाजस सुरुवात केली आहे.
वादात सापडलेले अधिकारी
बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये चांनीचे वैभव पाटील हे अनेक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले आहेत, यामध्ये नव्यानेच घडलेले महिला हत्याकांड, पत्रकारांना बंदूक दाखवणे यासारख्या प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत, तर प्रेमानंद कात्रे हिवरखेडला असताना गोमांस जप्ती प्रकरणात वादग्रस्त ठरले होते, तिरुपती राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचीन्ह निर्माण झाले होते.