तृतीयपंथीयांचा काैलखेडमधील दुकानात हैदाेस, चिमुकलीसह गर्भवतीलाही मारहाण

By सचिन राऊत | Published: October 6, 2023 05:13 PM2023-10-06T17:13:07+5:302023-10-06T17:14:57+5:30

काैलखेड चौक परिसरात पेंढारकर मूर्तिकार यांच्या बाजूला मंगेश टेलर्स कापड शिवण्याचे काम करतात. गु

Transgender beat up small girl and pregnant women in a shop in Kailkhed akola | तृतीयपंथीयांचा काैलखेडमधील दुकानात हैदाेस, चिमुकलीसह गर्भवतीलाही मारहाण

तृतीयपंथीयांचा काैलखेडमधील दुकानात हैदाेस, चिमुकलीसह गर्भवतीलाही मारहाण

googlenewsNext

अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काैलखेड चौक परिसरात असलेल्या मंगेश टेलर्सच्या संचालकासह त्यांच्या मुलाला ५०० रुपयांची मागणी केल्यानंतर २०० रुपये दिले म्हणूण तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. त्यानंतर या ठिकाणी उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीस मारहाण करीत गर्भवती महिलेलाही लाेटपाट केल्यानंतर दुकानातील साहित्य बाहेर फेकून दिले.

काैलखेड चौक परिसरात पेंढारकर मूर्तिकार यांच्या बाजूला मंगेश टेलर्स कापड शिवण्याचे काम करतात. गुरुवारी रात्री ते दुकानामध्ये त्यांच्या मुलासाेबत कापड शिवण्याचे काम करीत असताना यावेळी पाच ते सहा तृतीयपंथी त्यांच्या दुकानामध्ये आले. त्यांनी पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे पाचशे रुपये नसल्याने त्यांनी २०० रुपये देतो म्हणून सांगितले. यावरुन तृतीयपंथीयांना संताप अनावर झाल्याने त्यांनी पुन्हा पाचशे रुपयांची मागणी करीत राडा सुरु केला.

काही वेळातच मंगेश टेलर्स व त्यांच्या मुलास जबर मारहाण करून पैसे हिसकाण्याचा प्रयत्न केला. मात्र गल्ल्यात पैसे नसल्याने तृतीयपंथीयांनी हैदाेस घालीत दुकानातील साहित्य फेकफाक केले. या घटनेची माहिती मीळताच मा़ नगरसेवक पंकज गावंडे मीत्रांनी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती खदान पोलिसांना दिल्यानंतर पाेलिसांनी तात्काळ दाखल हाेत फरार झालेल्या तृतीयपंथींयाचा शाेध सुरु केला. हे तृतीयपंथी बनावट असल्याचे सुत्रांचे म्हणने आहे.

Web Title: Transgender beat up small girl and pregnant women in a shop in Kailkhed akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.