कत्तलीसाठी बैलांची वाहतूक; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:21 AM2017-07-19T01:21:15+5:302017-07-19T01:21:15+5:30
अकोला : दोन मालवाहू वाहनांमधून १६ बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरशाद ऊर्फ राजा शेख कासम कुरेशी (३३ रा. कागजीपुरा) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दोन मालवाहू वाहनांमधून १६ बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरशाद ऊर्फ राजा शेख कासम कुरेशी (३३ रा. कागजीपुरा) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची कारागृहात रवानगी केली.
कोतवाली पोलिसांनी दोन वाहनांमध्ये बैल कोंबून नेत असताना दगडी पूल येथे रविवारी सकाळी दोघांना पकडले. वाहनचालक मजहरउद्दीन सिराजउद्दीन कुरेशी (२७ रा. कागजीपुरा) आणि एैफाज अहमद अब्दुल सत्तार (३0 रा. मुल्लानी चौक, सिंधी कॅम्प) हे एमएच ३0 एबी २२0६ आणि एमएच 0४ डीके ३४६२ क्रमांकाच्या दोन मालवाहू वाहनांमध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी वाहनातून आम्ही बैल कत्तल करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली. या दोघांनी बैलांचा मालक कागजीपुऱ्यात राहणारा शेख इरशाद ऊर्फ राजा हा असल्याचे सांगितले. कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. तिघाही आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.