विनारॉयल्टी मुरुमाची वाहतूक, ७९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:08+5:302021-03-04T04:33:08+5:30
अकोला-वाशिम रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मॉन्टे कार्लो कंपनीने सुरुवातीला महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना ...
अकोला-वाशिम रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मॉन्टे कार्लो कंपनीने सुरुवातीला महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लावला असल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामाकरिता शिर्ला फाट्यानजीक मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. शिर्ला फाट्यानजीक रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदण्यात आली आहे. या नालीमधून १४७६ ब्रास मुरुमाचे खोदकाम करण्यात आले. हा मुरुम वाहनाने भंडारजगावानजीक असलेल्या एका अकृषक जमिनीवर साठविण्यात आला आहे. सदर मुरुमाची वाहतूक करताना किंवा साठा करताना महसूल विभागाची परवानगी, रॉयल्टी असणे गरजेचे आहे. परंतु कंपनीने परवानगी न घेता, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला. विशेष म्हणजे मुरुमाची अवैध वाहतूक करून कंपनीने स्वत:च्या क्वॉटर रेस्ट हाऊससोबतच काही खासगी कामासाठी खोदकाम केले. तसेच त्याची शिर्ला फाट्यावर खोदकाम करून भंडारज गावाजवळील कॅम्पमध्ये नेण्यात आले. यासंदर्भात आमदार गोपिकिशन बाजोरिया विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.