लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:13 PM2019-09-27T12:13:34+5:302019-09-27T12:13:40+5:30

पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.

trap of Deputy inspector of Police by 'ACB' | लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

googlenewsNext


अकोला : देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास पकडल्यानंतर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून अटक न करता त्यास सोडून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा त्यावेळी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यास अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. सलग दोन दिवसांत एकाच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि एक कर्मचारी लाचखोरीत अडकल्याने मोठ्या प्रमाणात लाचखोरी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
मूर्तिजापूर येथील सिरसो परिसरातील रहिवासी एका ४३ वर्षीय तक्रारदारावर दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक न करण्यासाठी त्याचवेळी सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासोबतच पकडलेली नवीन दुचाकी जप्त न करता जुनी दुचाकी जप्तीमध्ये दाखविली. या मोबदल्यात एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले; परंतु तक्रारदारावर काही संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही; मात्र या प्रकरणाची पडताळणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आॅगस्ट रोजी केली. या पडताळणीत आरोपी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके हा दोषी आढळल्याने लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केली.
दोन दिवसांत दोन ट्रॅप
लाचखोर पोलीस अधिकारी व कर्मचाºयावर दोन दिवसांत दोन ट्रॅप झाल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रचंड वाढल्याचे वास्तव आहे. पहिल्याच दिवशी एका कर्मचाºयास लाच घेताना अटक केल्यानंतर दुसºयाच दिवशी त्याच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना पडताळणीत दोषी आढळतो. यावरून लाचखोर पोलिसांनी गेंड्याची कातडी पांघरल्याचे दिसून येत आहे.

Web Title: trap of Deputy inspector of Police by 'ACB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.