दारूची वाहतूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: April 4, 2017 01:34 AM2017-04-04T01:34:42+5:302017-04-04T01:34:42+5:30
शहरातील रतनलाल प्लॉट चौकातील पॅलेस वाइन बारमधून देशी आणि विदेशी दारूसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाणाऱ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अटक केली.
अकोला: शहरातील रतनलाल प्लॉट चौकातील पॅलेस वाइन बारमधून देशी आणि विदेशी दारूसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन जाणाऱ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांनी अटक केली.
न्यू भीम नगरातील रहिवासी ऋषिकेश महेंद्र शिरसाट हा एम एच ३० एक्स ८८९९ क्रमांकाच्या दुचाकीवर देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह सदर युवकावर पाळत ठेवून देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना रंगेहात अटक केली. त्याच्याकडून देशी दारूसह मोबाइल आणि दुचाकी असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांनी केली.