छेड काढणा-या ग्रा.पं. सदस्यास महिला कर्मचा-याने दिला चोप!
By Admin | Published: August 6, 2016 02:02 AM2016-08-06T02:02:02+5:302016-08-06T02:02:02+5:30
अकोला जिल्ह्या परिषदेमधील प्रकार; बोरगावमंजू ग्रामपंचायतच्या सदस्याने काढली होती छेड.
अकोला, दि. ५ : छेड काढणार्या आणि शेरेबाजी करणार्या बोरगावमंजू ग्रामपंचायतच्या एका मजनू सदस्यास जिल्हा परिषदेतील एका चतुर्थश्रेणी महिला कर्मचार्याने चांगलाच चोप दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत घडली.
बोरगावमंजू येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वसतकार गत दोन-तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेतील एका सभापतींच्या कक्षात कार्यरत एका चतुर्थश्रेणी महिला कर्मचार्याची छेड काढून शेरेबाजी करीत होता. या मजनू ग्रामपंचायत सदस्यास संबंधित चतुर्थश्रेणी महिला कर्मचार्याने कानशिलात लगावून चपलीने बदडले. महिला कर्मचार्याने चोप दिल्याच्या घटनेनंतर संबंधित ग्रामपंचायत सदस्य वसतकार लगेच जिल्हा परिषदेतून काढता पाय घेत पसार झाला. या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. विविध विभागांसह जिल्हा परिषद वतरुळात या घटनेची चर्चा सुरू होती.