गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी १०० रुपये जास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:25+5:302021-09-15T04:23:25+5:30
या मार्गावर धावतात सर्वाधिक ट्रॅव्हल्स अकोला - पुणे अकोला - मुंबई अकोला - सूरत अकोला - नागपूर भाडे वाढले ...
या मार्गावर धावतात सर्वाधिक ट्रॅव्हल्स
अकोला - पुणे
अकोला - मुंबई
अकोला - सूरत
अकोला - नागपूर
भाडे वाढले
आधीचे सध्या
अकोला - पुणे ७०० ८००
अकोला - मुंबई ९०० १०००
अकोला - सूरत १००० ११००
अकोला - नागपूर ४५० ५००
दोन वर्षानंतर बरे दिवस
कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आहे. आता निर्बंध हटल्यानंतर थोड्याफार प्रमाणात व्यवसाय सुरू झाला आहे. तरीही बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स उभ्या आहे. गणेशोत्सवामुळे बुकिंग वाढले आहे.
- विनोज जकाते, ट्रॅव्हल्स मालक
प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश ट्रॅव्हल्स उभ्या आहे. या स्थितीतही प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ झाली नाही. सद्यस्थितीत पुणे, मुंबई व नागपूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहेत. शिर्डी, औरंगाबाद ट्रॅव्हल्स बंद आहे.
- पप्पू जोशी, ट्रॅव्हल्स मालक
प्रवाशांना फटका
कोरोना काळात अनेक नागरिक घरी परतले होते. निर्बंध हटल्यानंतर ते परतत आहे. ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाल्यास बाहेरगावी जाण्यासाठी आर्थिक फटका बसणार आहे.
- दिनेश देशमुख
आरामदायक प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असतो. कामानिमित्त वारंवार मुंबई जावे लागते; मात्र भाडेवाढ झाल्यास अडचणी वाढतील.
- अजय गाढे