राखी पोर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी आता १२०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:28+5:302021-08-20T04:23:28+5:30
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ मार्ग ...
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ
मार्ग आधीचे भाडे आता
अकोला-मुंबई १००० १२००
अकोला-पुणे ८०० ९००
अकोला-सुरत ८५० १०००
अकोला-नागपूर ५५० ६००
ट्रॅव्हल्सच्या संख्येत वाढ कमीच!
निर्बंधांच्या काळात प्रवासी मिळत नसल्याने ट्रॅव्हल्सची संख्या मोजकीच होती. आता निर्बंध शिथिल झाले असून प्रवासी संख्याही वाढली आहे; परंतु खासगी ट्रॅव्हल्सला अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
मात्र, राखी पौर्णिमेनिमित्त दोन दिवस बुकिंग अधिक आहे. पुणे येथून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ४-५ ट्रॅव्हल्स बसच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
डिझेल दरवाढीचा फटका
दीड वर्षांपासून कोरोनामुळे खासगी ट्रॅव्हल्सना प्रतिसाद मिळत नाही. प्रवासी मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सही कमी सोडण्यात येत आहेत. त्यातच डिझेलचीही दरवाढ झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
- विनोद जकाते, ट्रॅव्हल्स मालक