विशेष रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट ‘कन्फर्म’ झाले तरच प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 07:06 PM2020-11-09T19:06:57+5:302020-11-09T19:11:44+5:30
Akola Railway Station News दिवाळीच्या पर्वावर प्रवास कसा करावा, ही चिंता अनेकांना सतावत आहे.
अकोला : विशेष रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट ‘कन्फर्म’ असल्याशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पर्वावर प्रवास कसा करावा, ही चिंता अनेकांना सतावत आहे.
रोजगार, नोकरी, उद्योगधंदे, कामकाजानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक जण दिवाळीत घरी, आप्तस्वकीयांकडे येतात; मात्र यंदा कोरोनामुळे या परंपरेला फाटा द्यावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण दिवाळीत रेल्वे गाड्या कमी असून, ‘वेटिंग कन्फर्म’ असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. ९ ते २० नाेव्हेंबरदरम्यान रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करताना आरक्षित तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. वेटिंग लिस्टवर प्रवास करण्यास मनाई आहे.
आरक्षण हाऊसफुल्ल
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, नागपूर- पुणे एक्स्प्रेस, मुंबई- नागपूर एक्स्प्रेस, अहमदाबाद -चेन्नई एक्स्प्रेस आदी रेल्वेचा समावेश आहे.
कोरोना नियमावलींचे पालन अनिवार्य
रेल्वे गाड्यांत अलीकडे प्रवास करताना कोरोना नियमावलींचे पालन करणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात धुणे या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.