१६ लाख रुग्णांवर उपचार; २६ हजार शस्त्रक्रिया

By admin | Published: October 3, 2016 02:31 AM2016-10-03T02:31:52+5:302016-10-03T02:31:52+5:30

२0१३ ते जून २0१६ पर्यंंंत १५ लाख ९८ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर २६ हजार ७५0 लहान-मोठय़ा शस्त्रक्रियाही या कालावधीत करण्यात आल्याची माहिती.

Treatment of 16 lakh patients; 26 thousand surgeries | १६ लाख रुग्णांवर उपचार; २६ हजार शस्त्रक्रिया

१६ लाख रुग्णांवर उपचार; २६ हजार शस्त्रक्रिया

Next

अकोला, दि. 0२- पश्‍चिम विदर्भाचे ह्यट्रामा केअर सेंटरह्ण म्हणून ओळख असलेले येथील सवरेपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्यानअकोला : पश्‍चिम विदर्भाचे ह्यट्रामा केअर सेंटरह्ण म्हणून ओळख असलेले येथील सवरेपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने जिल्हय़ासह लगतच्या वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील रुग्णांचा ह्यसवरेपचारह्णमधील रुग्णसेवेवर दिवसेंदिवस विश्‍वास वाढत आहे. वर्ष २0१३ ते जून २0१६ पर्यंंंत सवरेपचार रुग्णालयात १५ लाख ९८ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर २६ हजार ७५0 लहान- मोठय़ा शस्त्रक्रियाही या कालावधीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महागडी आरोग्य सेवा, खासगी दवाखान्यांमधील डॉक्टरांकडून आकारले जाणारे घसघसीत शुल्क आणि महागडा उपचार यामुळे गरीब व निराधार रुग्ण उपचारासाठी ह्यसवरे पचारह्णला पसंती देतात. ह्यसवरेपचारह्णमध्ये अत्याधुनिक उपचार व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असल्यामुळे येथे दाखल होणार्‍या रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होते. वर्ष २00२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात आल्यानंतर, या रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा वधारला आहे. एक्स रे, सिटी स्कॅनसह इतर अत्याधुनिक उ पकरण व यंत्र ह्यसवरेपचारह्णमध्ये उपलब्ध झाले आहेत.
राज्य सरकारकडून मदत मिळत असल्याने अनेक असाध्य रोगांनी पीडित रुग्णांवर येथे शस्त्रक्रियाही करण्यात येतात. तसेच पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत नि:शुल्क उपचार करण्यात येतात. त्यामुळे ह्यसवरेपचारह्णमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे.

'सवरेपचार'मध्ये उपचार घेतलेले रुग्ण

वर्ष             उपचार                    भरती रुग्ण
२0१३        ३ लाख २५ हजार ३0२     ४0 हजार ४८८
२0१४        ३ लाख ६५ हजार ४४२      ४५ हजार ९0४
२0१५        ४ लाख ८८ हजार ९४६      ४६ हजार ४२४
२0१६        २ लाख ५५ हजार ७७९       २४ हजार ८६

१८0८0 मोठय़ा तर, ८६७७ छोट्या शस्त्रक्रिया
मनुष्यबळाचा अभाव, आवश्यक उपकरणांची कमतरता असतानाही ह्यसवरेपचारह्ण रुग्णालयात २0१३ ते २0१५ पर्यंंंत १८,0८0 मोठय़ा व ८६७0 छोट्या अशा एकूण २६ हजार ७५0 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये कान-नाक-घसा, नेत्र, पोट, अस्थी व इतर शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

 सवरेपचार  रुग्णालयात दाखल रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्याचा येथील सर्व डॉक्टरांचा प्रयत्न असतो. तसेच रुग्णालयातील सुविधाही चांगल्या दर्जाच्या आहेत. त्यामुळे रुग्णांचा विश्‍वास वाढला आहे.

- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

Web Title: Treatment of 16 lakh patients; 26 thousand surgeries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.