उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:44 PM2019-04-09T13:44:23+5:302019-04-09T13:44:29+5:30

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे.

Treatment is cheap; But patients has to counting money for medicines | उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे

उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे

Next

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयात नियमित लागणाऱ्या औषधांचा पुन्हा तुटवडा भासत असल्याने गरिबांसाठी हा उपचार महागडा ठरत आहे.
खासगी दवाखाना किंवा रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नाही, म्हणून हजारो रुग्ण दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे अत्यल्प खर्चात त्यांच्यावर उपचार होत असून, नियमानुसार नि:शुल्क औषधही दिले जाते; मात्र गत काही दिवसांपासून येथे येणारा रुग्ण उपचारानंतर थेट खासगी औषध केंद्रावर औषध खरेदी करताना दिसून येतो. या रुग्णांशी संवाद साधला असता, उपचार स्वस्तात मिळाला, तरी सर्वोपचार रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शिवाय, उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनदेखील डॉक्टर बाहेरूनच आणायला सांगतात. खासगीत उपचार परवडत नाही, म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संस्थेतर्फे सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी ही घोषणा दिली आहे; परंतु वास्तविकता यापेक्षा उलट असल्याचे निदर्शनास येत आहे.

औषधांबाबतीत डॉक्टरही संभ्रमात
गत वर्षभरापासून सर्वोपचार रुग्णालयात हाफकीनकडून औषध पुरवठ्याची समस्या सुरू आहे. त्यामुळे औषधेच उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषध आणायला सांगितल्या जायचे; परंतु यातील ५० टक्के औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे; परंतु संबंधित औषध उपलब्ध आहे की नाही, याबाबत डॉक्टरांमध्येच संभ्रम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तीन महिने पुरणार येवढाच औषध पुरवठा हाफकीनकडून पुरविण्यात आला होता. त्यातला बहुतांश औषध साठा संपण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात पत्रव्यवहार करणे सुरू आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

Web Title: Treatment is cheap; But patients has to counting money for medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.