विना परवानगी कोविड रुग्णांवर उपचार, तीन रुग्णालयांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:18+5:302021-04-19T04:17:18+5:30
तर होणार दोन वर्षांची शिक्षा विना परवानगी कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करत असल्याने तीन रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...
तर होणार दोन वर्षांची शिक्षा
विना परवानगी कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करत असल्याने तीन रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित डॉक्टरांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
रेमडेसिविरचाही होतोय वापर
कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतानाही शहरातील खासगी रुग्णालयात केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारावर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनही दिले जात असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसताना अशा रुग्णालयात रेमडेसिविर सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र समोर आले आहे. हा प्रकार गंभीर असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.