प्रत्येक झाडावर लावली वृक्षारोपण करणाऱ्याची ‘नेमप्लेट’
By Admin | Published: July 2, 2017 08:23 PM2017-07-02T20:23:00+5:302017-07-02T20:23:00+5:30
वृक्षसंवर्धनासाठी पातूर तहसीलदाराची अभिनव संकल्पना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : नजीकच्या श्रीकांत पर्वतावर पातूर तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले आहे. या वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडावर ते लावणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नेमप्लेट लावण्याची व संबंधित कर्मचाऱ्याने आठ दिवसातून एकदा तरी त्यावर लक्ष ठेवण्याची संकल्पना पातूरचे तहसीदार डॉ.आर.जी. पुरी यांनी राबवली.
शिर्ला येथे १ जुलै रोजी पातूर तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, लिपिक आदी कर्मचाऱ्यांनी पर्यावरण समृद्धीसाठी वृक्षारोपण केले. हे वृक्ष जगले पाहिजेत यासाठी प्रत्येक झाडाला प्रत्येक कर्मचाऱ्याची नेमप्लेट लावली. ते जगावे यासाठी वृक्षारोपण करणाऱ्या प्रत्येकाने आठ दिवसातून किमान एकदा तरी झाडाची अवस्था काय आहे हे प्रत्यक्ष पाहून ते जगले पाहिजे यासाठी लक्ष ठेवावे असा निर्णय सर्वानुमते घेतला.वृक्ष संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या या अभिनव संकल्पनेबद्दल येथील पर्यावरण प्रेमीं नागरिकांनी तहसीलदार आर.जी. पुरी यांचे अभिनंदन केले.